सिद्धेवाडीत "माझी लाडकी बहीण "लाभार्थ्यांना दाखल्याचे वाटप,

सिद्धेवाडीत "माझी लाडकी बहीण "लाभार्थ्यांना दाखल्याचे वाटप,

◼️ तर तालुक्यात काही गावातील ठिकाणी भाऊसाहेब कडून              लाभार्थ्यांची अडवणूक,

◼️ पात्र महिला लाभार्थ्याकडून संताप व्यक्त,

◼️ संबंधित पात्र लाभार्थ्यांना दाखले मिळण्याकरता तहसीलदार          सचिन लंगुटे यांनी स्वतः लक्ष घालण्याची महिलांची मागणी

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले वितरण करण्याचे शिबिर तलाठी कार्यालयात आयोजित करण्यात आले.

मध्यप्रदेश राज्यातील महिलांना लोकप्रिय ठरलेल्या धरतीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधान सभेत केली. या योजनेत 21 ते 65 वर्षे वयात गटातील पात्र महिलाना राज्य सरकार मार्फत दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतील त्यासाठी 46000 कोटी निधीचा तरतूद करण्यात आली आहे. 

माझी लाडकी बहीण योजनेच्या शिबिर हे पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते. या योजनेचा लाभ मिळण्याकरता पात्र लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. यामध्ये विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्तत्या आणि निराधार यांचा समावेश असणे गरजेचे आहे . 

यावेळी बोलताना मंडल अधिकारी बाळासाहेब मोरे म्हणाले की या योजनेचा लाभ मिळण्याकरिता लाभार्थ्याचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे, घरात कोणीही आयकर जाताना नसावा, लाभ घेण्याकरिता लाभार्थ्याचे राष्ट्रीय कृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे .अशी माहिती कासेगाव मंडळ अधिकारी मोरे यांनी पात्र लाभार्थ्यांना सांगितली तसेच गाव कामगार तलाठी अश्विनी शेंडे म्हणाल्या की, सिद्धेवाडी, एकलासपूर, शिरगांव या गावातील एकही महिला भगिनी "माझी लाडकी बहीण ,या योजनेच्या लाभांपासून वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल असे सांगितले. 

यावेळी तलाठी कार्यालयाकडून 250 लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखल्याचे वितरण करण्यात आले. 

यावेळी सिद्धेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणी जाधव, एकलासपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुधामती अवताडे, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी जाधव, पंढरपूर तालुका दूध संघाचे संचालक रामचंद्र जाधव, विलास शिंदे, सुनील जाधव, दशरथ पाटील, सतीश जाधव, महादेव घाडगे, दत्तात्रेय ताड, धनाजी ताड यांच्यासह सिद्धेवाडी, एकलासपूर, शिरगाव येथील पात्र महिला लाभार्थी मोठ्या संख्येने आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सहाय्यक कर्मचारी सागर ताड ,साहेबराव भोपळे ,आरोग्य सेविका,आशा कर्मचारी यांनी मदत केली.