ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर मालक व चालक यांनी ट्रॅक्टर - ट्रॉलीला रेडियम रिप्लेटर बसवून अपघात टाळावेत ◾ पोलीस निरीक्षक सुरेश चिल्हावार याचे चालक-मालकानो अपघात टाळण्यासाठी आपली सुरक्षा, आपली जबाबदारी व खबरदारी घ्या आणि सुरक्षित रहा असे भावनिक आवाहन

ऊस वाहतूकदार ट्रॅक्टर मालक व चालक यांनी ट्रॅक्टर - ट्रॉलीला रेडियम रिप्लेटर बसवून अपघात टाळावेत  ◾ पोलीस निरीक्षक सुरेश चिल्हावार  याचे चालक-मालकानो अपघात टाळण्यासाठी आपली सुरक्षा, आपली जबाबदारी व खबरदारी घ्या आणि सुरक्षित रहा असे भावनिक आवाहन

---------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील कारखान्यास ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक-मालक यांनी अपघात टाळण्यासाठी आपल्या ट्रॅक्टर ट्रक इत्यादी ऊस वाहतूक वाहनांना रेडियम रिप्लेटर बसवून आपली सुरक्षा आपली जबाबदारी पार पाडावी व  पोलीस यंत्रणेस सहकार्य करण्याचे आवाहन पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्हावार वार यांनी केले आहे. सध्या पंढरपूर तालुक्यातील सर्वच साखर कारखान्याचे धुराडे पेटले असून गळीत हंगाम  सुरळीत चालू असून साखर कारखाना सीजन चालू असताना संपूर्ण तालुक्यात ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रक इत्यादी अनेक चार चाकी वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात सुरू असते, ट्रॅक्टर चालक यांनी आपल्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरू नये, वाहनांना पुढील व मागील बाजूस योग्य दिवे लावावेत, वाहतुकीचे नियम पाळावेत ,अपघात टाळण्यासाठी सुरक्षित वाहन चालवावे, रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर चालवताना विशेष काळजी घ्यावी, ऊस वाहतूक करणाऱ्या चालक- मालकाने आपली सुरक्षा आपली, जबाबदारी घेऊन सुरक्षितता बाळगावी तसेच वाहतुकीस काही अडचणी निर्माण झाल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलीस निरीक्षक सुरेश चिल्हावार यांनी केले आहे.