पंढरपुरात पोलिसांच्या वतीने एकता दौड. ◾राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग.

पंढरपुरात पोलिसांच्या वतीने एकता दौड.   ◾राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग.

---------------------------------------------------------------------------
पंढरपूर :( दै.पंढरी नगरी न्यूज )राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस ठाणे ते शिवाजी चौक परत शिवाजी चौक ते पंढरपूर शहर पोलीस ठाणे अशी रन फॉर युनिटी एकता दौड आयोजन करण्यात आली होती. यांमध्ये तिन्ही पोलीस स्टेशन चे मिळून 8 पोलिस अधिकारी व 89 कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.एकता दौड मध्ये  पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक सुरेश चिलावर, पंढरपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक 
रेखा घनवट,  पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक महेश ढवाण तसेच इतर  04 पोलिस अधिकारी व 63 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.तसेच पंढरपूर शहरातील अकॅडमी व के बी पी कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते. 


सरदार वल्लभाई पटेल यांच्या 151 जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिन  31 ऑक्टोबर  रोजी साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज रोजी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे एकता शपथ घेण्यात आली. पोलीस निरीक्षक महेश ढवाण व पंढरपूर शहर पोलीस ठाणे व इतर 04 पोलिस अधिकारी व 26 पोलीस अंमलदार हजर होते.